• thewanderingsoul 6w

  बरसला मेघ जरासा
  मन चिंब भिजून गेले
  तुझ्या डोळ्यातील भाव
  माझे ठोके चुकवून गेले

  तुझ्या ओल्या गालाचा
  तो कोमल स्पर्श
  तुला कवेत घेताच
  होतो मनास हर्ष

  थरथरत्या तुझ्या ओठांतून
  येई हळुवार हाक एक
  मी हरवून जातो येथे
  तुझ्या मिठीच्या विळख्यात  ©R.Raje