• shona_luv 23w

  ��I love u so much mom��
  ��Dedicated to all great mothers��
  ��Happy mother's day��

  Read More

  कोणत्या शब्दात सांगू आई ,तू माझ्यासाठी काय आहेस?
  देवाने दिलेला साक्षात्कार तू
  माझ्या जीवनाचा आधार तू
  माझ्या जीवनाची पहिली हाक तू
  हृदयाचा ठोका अन पहिला श्वास तू
  मायेच्या पदराने राखण करणारी हिरकणी आहेस
  कोणत्या शब्दात सांगू आई ,तू माझ्यासाठी काय आहेस?

  माझ्या अस्तित्वाची सृष्टी तू
  अंधारमयी जीवनातील दृष्टी तू
  निष्पाप अस माझं प्रेम तू
  काळजीचा अनोखा नेम तू
  न संपणारा अध्याय आहेस
  कोणत्या शब्दात सांगू आई , तू माझ्यासाठी काय आहेस?

  ©shona_luv ✍️