• thephysicsguy 6w

  आभाळ

  कोरड्या आभाळाची कोरडी कहाणी
  आभाळाने कुणाकडे मागावं पाणी?

  सुकल्या तळ्याचं आटलाय पाणी
  दूध नाही तिथे कसं येईल लोणी

  आकाश वाहे ढगांची ही प्रेतं
  वाटात खोटी सारी पावसाची गाणी

  आभाळाच्या पाण्यालाही लागले ग्रहण
  अंधारल्या साऱ्या दिशा उजाडावं कोणी?  ©thephysicsguy