• kasardipali 6w

    झाडाझुडपात दूरवर त्या डोंगर कपारीत,भयाण अंधारात किर्रर रातकिडयांसोबत कुणी विचारही केला नसेल पण स्वर्ग अवतरलाय ,लंकेसही फिका पाडेल असं सुंदर दृश्य...नाशिक पासून थोड्याच अंतरावर, सर्वांनी एकदा जरूर बघावं असं सौंदर्य... जे कॅमरात मावत नाही पण डोळ्यात साठतं,तृप्त करतं मनाला, आणि पटते निसर्गाची किमया...जेव्हा चमचमणारे काजवे तुमच्या अवती भॊवती फिरतात आणि एक अवर्णिनिय आनंद तुमच्या मनाला भोवळ घालून जातो.. परतीच्या प्रवासाला देऊन जातो ते एक स्मित हास्य...खुलवणारं, सर्व विसरवणारं..जगणं शिकवणारं....
    ©kasardipali