• sumit_bari 3w

  नववर्ष

  आज पुन्हा कलमेचा बाण चालला,
  आज पुन्हा कागदाची तालीम झाली.
  दोघांची साथ धरून पुन्हा एकदा,
  बोचऱ्या थंडीत हातांची वळणे झुलली.

  मागायला माफी शब्द सुचत नव्हते,
  ना सुचत होते अक्षर.
  आठवून प्रसंग असे बिकट,
  झालो हळवा क्षणभर.

  जुने ते असेल सोने म्हणत,
  पुन्हा सरलं हे वर्ष.
  येणारं वर्ष असेल हर्षोल्लासचे,
  दरवळील पुन्हा हर्ष.

  चुकभुलीची माफी असावी,
  मोठ्या मनाची माणसं तुम्ही.
  एवढं बोलून दोन शब्द संपवतो,
  आणि रजा घेतो आम्ही.
  ©sumit_bari