• piyushaaa 49w

  संपला तो प्रवास....

  संपला तो माझ्यातला विश्र्वास होता
  तुझ्या वरचा नाही तर तो होता स्वत‌‌: वरचा
  माझ्यातला मी च तुला, माझी समजत होतो
  पण माझ्यातल्या मी पणामुळे तु माझी झाली नाही
  तु गेली आणि माझ्यातला तो मी पणा ही गेला,
  कदाचित चूक कळली त्याला...
  कळत नाही की, शोधावं कुणाला स्व:त्याला,
  की माझ्यात असणाऱ्या तुला..
  आणि शोधावं देखील कुठं...
  तु माझी झाली नाही, हा विषयच नाही ग,
  पण तू कुणाचीही होऊ शकली नाही हा मोठा विषय आहे
  मला माहिती नाही काय होतं तुझ्या डोळ्यांत,
  पण मला मात्र मीच दिसायचो त्यातं
  संपला तो प्रवास माझा कारण, मी संपलो
  येणारे तुझे ते अश्रू पुरेसे होते माझ्या संपण्यासाठी.
  ©piyushaaa