• shabda_bahar 22w

  Of surprises & memories!!
  #love#memories!!
  ❤❤❤

  Read More

  आठवणं

  दाटे मनात अंगण
  असे पाऊस बनून,
  किती अनावर होती
  जुन्या आठवांचे घन..

  एक नाजूकं क्षण
  आठवायचा मोहरून,
  त्याच्या हजेरीवर सख्या
  तुझ्या पावलांची खुण...


  एक आठवण वाके
  मनं गवाक्षामधून,
  झुले झुला तयांचा
  जश्या माहेरवाशीण..

  तुझ्या माझ्या रुसव्याच्या
  टिपऱ्याही पडलेल्या,
  पाठशीवन खेळती
  सावल्या दमलेल्या..

  आता येता जाता कधी
  बघतेच मी वळून,
  तेव्हा अनावर होती
  जुन्या आठवांचे घन...!

  ©Priya_charjan