adityadalvi25

www.instagram.com/adityadalvi25

Enter into the world on 25th Aug 1996 music lover/nature lover "writer"

Grid View
List View
Reposts
 • adityadalvi25 3w

  Bye bye

  Hello my loved ones and all my followers I Just wanted to clarify the one thing that this would be my last day on my mirakee am not gonna post on this anymore but am just wanna thankful to all my mirakee friends and followers even to the team for their lovely support so just keep writing and blessed this journey will be remembered forever

  Thank you...❣️❣️✌️✍️

  #AD
  ©Aditya Dalvi

 • adityadalvi25 4w

  बांधिलकी

  विचारत असतील सर्व तर हवा कशाला गर्व?
  आहे एकच सर्व तर का बघायचा वर्ण?
  होत असेल प्रेमाने एकमेकांच जुळणं
  तर कशासाठी बनवायचं जातीवादाने खेळणं?
  ओळखीसाठीचं मर्यादित राहूदे हे सगळं नावगाव जातीभाती विचारणं
  बाकी नको कोणतेही कृत्य ज्याने घडेल परस्परांमधील जाळणं
  बंद करा हे सर्व एकच आहे "महाराष्ट्र" एकच सारा "विदर्भ"
  एकजूट राहूनचं घडू शकते उत्तम असे या देशाचे भावी "पर्व"


  ©Aditya Dalvi

 • adityadalvi25 6w

  घटकांच आयुष्य

  आयुष्य जगायचं म्हटलं तर इथे प्रत्येकालाच
  जागोजागी जागं राहावं लागतचं कारण हे आयुष्यच अस आहे.
  महत्वपूर्ण "घटक" व्हायचं असेल तर गरजेच्या ठिकाणी भाग घ्यावं लागतो नाहीतर स्वतःच्या अपेक्षा क्षणोक्षणी खटकायला लागतात,
  ज्याला काडीमात्र मोल राहत नाही
  आणि मग हाती मरणाच्या "घटिका" मोजत राहण्याशिवाय
  काही पर्याय उरत नाही.
  ©Aditya Dalvi

 • adityadalvi25 7w

  जन्मांतर

  भेटताच जन्म झाला वावर सगळ्यात
  आयुष्य झाल सुरू टप्याटप्यात जसे पडते पाणी गाळयात
  उद्भवतात प्रश्न कधी कधी, परिस्थिती रुपांतरीत होते चिन्हांत
  कधी सरळ कधी वळणे हे चढउतार ठरलेलेचं असतात या जन्मांत
  ©Aditya Dalvi

 • adityadalvi25 8w

  पारडं

  निर्मळ त्या मनाने सर्व कर्माचे कलंक फेडावे
  पापण्यास ओघळ लागण्या आधीच मनाजोगते घडावे
  बदलाचे वारे अंगी सदा भिनावे
  खटाटोपाच्या डावानंतर हाती फक्त यशाच पारडं पडावे
  ©Aditya Dalvi

 • adityadalvi25 8w

  पापपुण्य

  करशील कर्म चांगले जर तू दर क्षणाला तर
  नाही भासणार गरज तुला लावण्याची रांग "दर्शनाला"
  ©Aditya Dalvi

 • adityadalvi25 8w

  #खटके #AD #marathi #त्रिवेणी #marathitriveni #wordings #writing #words

  Read More

  खटके

  येतोच कधी कधी दुरावा प्रेमाच्या नात्यांत उडतातच हे खटके
  जरी अडकलो कितीही बंधनात शेवटी होतातचं खिसे फाटके

  *रंग भिंतींचे असो की प्रेमाचे फिके पडताच दरिद्री दिसते*

  ©Aditya Dalvi

 • adityadalvi25 8w

  जीवनावश्यक

  एका ताटातलं अन्न संपल किंवा कमी पडायला लागलं की
  दुसरीकडे हात घालत अन्न प्राशन करायला लागतात काही
  पण प्रत्येक ताट हे पंचपक्वांनाने भरलेलं असेल किंवा प्रत्येक ताटात
  तुम्हांला गोडच मिळेल अशी अपेक्षा करू नका
  ही अन्नांची ताट जशी
  कधी तुमच्या गरजा भागवतात
  तर कधी सोयी नुसार सुखाचा आनंद देतात
  किंवा कधी उपाशी मारतात ना अगदी तसच
  आहे हो माणसांच पण जीवनावश्यक ....….!!!!
  त्यामुळे जरा जपून आणि सांभाळून ठेवा दोन्ही
  ©Aditya Dalvi

 • adityadalvi25 8w

  शब्दप्रेमी

  भावनेच्या विळख्यात शब्दांना जोडले
  जाणीत भावनांना मनमाझे शब्दप्रेमी जाहले
  लेखनाच्या प्रवासात मी शब्दांना अर्थ देऊन पाहिले
  शेवटी पाहता पाहता शब्द हे माझे बनून राहिले
  ©Aditya Dalvi

 • adityadalvi25 11w

  आरसा

  उधाणलेल्या वाऱ्याला दिशा कोणती नसावी
  उडुन जावी छत्री खाली तू चिंबसी भिजावी
  आठवण होता तुझी मजला तंद्री तुझी लागावी
  मी पाहणाऱ्या आरस्यात सदा प्रतिबिंबित तू असावी

  ©Aditya Dalvi