ashwinilike

www.instagram.com/ashwinilike

my ebook on Amazon kindle: The Mindful Dose of Inspiring Quotes If you love to read here is a great treat! If you like my writing follow me.

Grid View
List View
Reposts
 • ashwinilike 19h

  ©ashwinilike

 • ashwinilike 3d

  पुन्हा भेटू... जखमेसह...
  काव्य✍: © अश्विनी लिके
  आपण भेटू...
  इकडच्या तिकडच्या गप्पा करू...
  इकडे तिकडे पहात...
  समोरासमोर असून...
  समोर न पाहता...
  बोलू....
  आपण भेटू...
  आपण बोलू...
  जे बोलायला हवे आहे,
  जे बोलायला हवे होते...
  ते बोल टाकून.
  होय,
  समोरासमोर असेपर्यंत
  जाणवणार नाही ते,
  जे एकटेपणा जाणवते...
  एक जखम
  प्रत्येक भेटीत खोल होत जाणारी...
  त्याबद्दल,
  पुढच्या भेटीत बोलू...
  बोलूनही काय उपयोग???
  या प्रश्नाने अजूनच,
  खोल होत जाणारी जखम...
  मग शांतताच शांतता.
  स्मशानशांतता म्हणतात तीच.
  मनातल्या मनातच हिशोब...
  हे बोलायचे होते,
  ते बोलायचे होते...
  याचा विचार करताना,
  क्षण भरतात...
  क्षण सरतात...
  चला मग पुन्हा भेटू.
  टाटा...बाय बाय...
  पाठमोरे होऊ आपण.
  समोरासमोर असूनही
  कधी समोर होतो आपण?
  पाठमोरे होताना
  पाठीला फुटलेले डोळे...
  डोळ्यांना फुटलेले झरे...
  लपवून ठेवत राहू...
  जपून ठेवत राहू.
  ती ठसठसत खोलवर जाणारी जखम...
  अर्धवट भेटीच्या दोर्‍याने
  पुन्हा एकदा शिवून टाकू.
  खूप खोलवर काही हलले आहे,
  या हलण्याची जाणीव,
  असेल तुला?
  तुला जाणवली कधी माझी जखम?
  तुझ्याकडे आहे ज्याचे मलम...
  माझ्याकडे आहे,
  डोळ्यांना फुटलेल्या
  खारट झर्‍यातील मीठ!
  हे मीठच मलमासारखे वापरायचे!
  तुझेही असे आहे का?
  हे विचारायला हवे होते.
  पण विचारूनही काय उपयोग?
  झऱ्यांचे अवकाळी आयुष्य..
  समुद्र बारमाही असतात...
  भावनांचे झरे हरवत‌ असतात,
  कर्तव्याच्या समुद्रात.
  आपण हरवून टाकू आपल्याला..
  जखमेसह.
  पुन्हा भेटू
  जखमेसह...
  ©ashwinilike

 • ashwinilike 1w

  ©ashwinilike

 • ashwinilike 2w

  ©ashwinilike

 • ashwinilike 2w

  ©ashwinilike

 • ashwinilike 2w

  ©ashwinilike

 • ashwinilike 2w

  ©ashwinilike

 • ashwinilike 2w

  ©ashwinilike

 • ashwinilike 2w

  ©ashwinilike

 • ashwinilike 2w

  ©ashwinilike