avyakt

Faceless Ageless Heartfull

Grid View
List View
Reposts
 • avyakt 11w

  माणसं

  काही माणसं अशी असतात
  'ज्यांच्या' प्रेमात पडलं की
  बाहेर येता येतं नाही
  काही माणसं अशी असतात
  'ज्यांना' प्रेमात पडलं की
  बाहेर येता येतं नाही
  ©अव्यक्त ©avyakt

 • avyakt 12w

  त्याचं प्रेम नक्की कोणावर असतं ?

  नक्की काय घडतं? कोणी सांगेल का?

  (पतंग- फुलपाखरासारखंच काहीसं, त्याच जातीतलं पण निशाचर.)
  #bonfire #moth #flame #intense #love #rage

  Read More

  शेकोटी आणि पतंग

  रात्रीच्या वेळी मित्रांसोबत शेकोटी जवळ गप्पा मारत बसलो होतो.
  तेवढ्यात अचानक दूर कुठुन तरी, एक इवलासा पतंग उडत आला आणि त्याने आगीमध्ये स्वतःला झोकून दिले.
  मनात एक विचार चमकून गेला की, का केलं असावं त्याने असं?

  आग त्याला जाळणार हे माहित असून तीच्या जवळ जाण्याचा मोह आवरता येत नाही त्याला.
  एक अनामिक ओढ असते त्याच्यात, तीच्या जवळ जाण्याची, स्वतःला झोकून देण्याची, जळण्याची.
  हेच सगळं ऐकलं होतं पतंगाबद्दल.
  पण हा मोह आवरला तर?
  आगीपासून लांब गेलं तर?
  जगला असता तो?
  कदाचित हो.
  काही क्षण.
  पण तीची ओढ जगू देत नाही त्याला.
  जिवंतपणी मरण यातना भोगण्यासारखं दुःख ते.
  त्यापेक्षा तो मरण पत्करतो.
  मरण म्हणावं का याला?
  की मोक्ष म्हणावं?
  नक्की काय होत असतं?
  इतकं प्रेम असतं का तिच्यावर त्याचं?
  इतकं की स्वतःचा विचार न करता त्यात स्वतःला झोकून देतो तो.
  की राग?
  राग असतो का त्यात?
  आपलं ज्यावर प्रेम आहे अश्या काळोखाला, तीच्या उजेडाने त्रास झाल्याचा राग?
  राग इतका की त्याला काहीच सुचत नाही आणि तो, ती आग विझवण्यासाठी स्वतःचा विचार न करता स्वतःला झोकून देतो त्यात.

  त्याचं प्रेम नक्की कोणावर असतं ?
  नक्की काय घडतं कोणी सांगेल का?

  ©अव्यक्त ©avyakt

 • avyakt 12w

  ती येते खूप प्रवास करून, सर्वांना सांगत तिच्या प्रेमाची कहाणी
  तिच्यावर नि:स्वार्थ प्रेम करत तो मात्र उभा असतो, एकाच ठिकाणी

  #marathi #poem #sea #river
  #love #sacrifice #story

  Read More

  सागर-सरिता

  ती म्हणाली एकदा
  नदी खुपचं त्याग करते
  कुठेही जन्म घेतला तरी
  समुद्रापाशी धाव घेते
  फक्त त्याला भेटण्यासाठीचं
  खडतर प्रवास करून येते
  स्वतःचा सगळा गोडवा
  त्यालाच तर अर्पण करते
  स्वतःच अस्तित्व विसरून
  त्याच्यामध्ये विलीन होते
  त्याच्या प्रेमासाठी सगळा त्याग
  तीच तर करत असते

  तो हसला, म्हणाला
  काय सांगाव समुद्राबद्दल
  तो तिच्यासाठीचं तर जळतो
  रूप घेऊन नभांचं
  तोच तर बरसतो
  कडू गोडं अनुभव तिचे
  सगळंच सामावून घेतो
  कडवट पणा ठेऊन
  फक्त गोडवा परत पाठवतो
  गोडवा पाठवून सगळा
  तो स्वतः खारा राहतो
  त्याच्या त्यागाची हि कहाणी
  कोण बरं सांगतो ?

  ©अव्यक्त ©avyakt

 • avyakt 13w

  सांग सखे, सरेल का कधी हे अंतर ?
  गवसेल का मज कधी क्षितिज, जे दूर ?

  #marathi #kshitij #distance #horizon

  Read More

  अंतर

  दूर दूर त्या क्षितिजावर
  तुला शोधे माझी नजर
  मी इथे हा किनाऱ्यावर
  असे आपल्यात हे अंतर

  सरता सरता सरत नाही
  वाढता वाढता वाढत जाई
  आपल्यातले 'हे' अंतर

  ©अव्यक्त ©avyakt

 • avyakt 14w

  जज़्बात

  दिल बयाँ ना कर पाए
  जो लफ़्जों से ना बहें
  आँखोंसे हि पढले तू
  वोह जज़्बात अनकहें

  ©अव्यक्त ©avyakt

 • avyakt 14w

  बारिश

  धुल पडी सडकों को बारिश ने धो दिया
  धूल से लतपत दिल को वो छु भी ना सकी

  ये जिस्म तो भिग गया पुरा का पुरा बारिश में
  इस रुह को जो भिगा दे वोह बारिश हे कहा

  ©अव्यक्त ©avyakt

 • avyakt 14w

  Some Rains Are Hidden By Smiles
  #rain #broken #heart #silent #cry

  Read More

  बारिश

  एक बारिश हे जो बाहर बरस रही हे
  एक बारिश हे जो अंदर बरस रही हे
  उस बारिश को तो सब देख रहे हे
  इस बारिश का तो किसीको पता नहीं

  ©अव्यक्त ©avyakt

 • avyakt 15w

  उन्हाळ्यात तापलेल्या माती सारखा आहे मी
  तू पाऊस होऊन ये ; मग सुगंध दरवळेल ��

  #firstrain #smellofsoil
  #thirst #love #wait

  Read More

  बारिश

  ग्रीष्म की तपती मिट्टी सा प्यासा हूं
  तू बारिश बनके बरस ; तो महक उठूँ

  ©अव्यक्त ©avyakt

 • avyakt 18w

  शिकायला हवं

  सोडून जाणाऱ्यांनी प्रेम करायला शिकायला हवं
  प्रेम करणाऱ्यांनी सोडता येणं शिकायला हवं

  ©अव्यक्त ©avyakt

 • avyakt 18w

  असच काहीतरी
  #look #heart #love #kindness
  #choice #puppy or #bitch

  Read More

  रूप

  घरी जात असताना त्याला ती दिसली.
  रस्त्याच्या पलीकडे चालत होती ती, त्याच दिशेला.
  छान बांधा, गोरीपान काया, तिला शोभून दिसणारा नक्षीदार आकाशी ड्रेस घातला होता तिने.
  तिला जवळून पाहता यावं म्हणून तो रस्ता ओलांडायला गेला.
  एवढ्यात त्यांची नजर एमेकांना भिडली.
  इवलेसे कान त्याला साजेशे नाजूक झुमके, गुलाबाच्या पाकळीसारखे गुलाबी ओठ आणि त्यावरचा तीळ, काळेभोर डोळे आणि ते हि काजळ लावलेले; तिला बघताच क्षणी ती त्याच्या मनात भरली.
  रस्ता ओलांडताना तो जरा थांबला, काही क्षण विचार करून त्याने रस्ता ओलांडला.
  तो आपल्याकडे येतोय, हे पाहून ती काहीशी भांबावली.
  तो तिच्या समोर आला, तिला एक गोड स्माईल देऊन थोडा पुढे गेला आणि खाली वाकून त्याने त्या कुत्र्याच्या पिल्लाला उचललं, त्याच्यावरची धूळ झटकली आणि त्याला रस्त्यापासून थोडं लांब सेफ जागी ठेऊन तो घराच्या दिशेने चालू लागला.
  (ते तेच पिल्लू होत जे काही क्षणापूर्वी तिच्या पायाजवळ आल होतं आणि आपला ड्रेस खराब होऊ नये म्हणून तीने त्याला पायानेच दूर ढकललं )

  ©अव्यक्त ©avyakt