“ये कौन आता हैं?”
दिल के दरवाजे पे कोई बार बार कुंडी खटखटाते हुए
ये कौन आता है मचलती रातों में छुपाए उद्वेग लिए हुए?
शमां जलती है, शमां बुझती है,
ये कौन आता है जुगनुओं को हम-राह बनाते हुए?
समंदर की लहरें कभी आसमाँ छूती है,
तो कभी जमीं चूमती है,
ये कौन आता है खुद में तूफ़ान-ए-हवादिस लिए हुए?
जश्न-ए-बहार है जहां, तो कहीं जश्न-ए-इश्क़ है जहां
ये कौन आता है जश्न-ए-ख़ामोशी लिए हुए?
©anuradhasaxena
#SGR09
928 posts-
anuradhasaxena 24w
4sep.2019
#feelings#Writersnetwork#mirakee#hindilekhan#hks#hindikavyasangam#hindiwriters#hind#writer#writing#pod#hindi#du#sayri#quote#pyar#mohabbat#post#satender_tiwari#4ank#heena_wakare#osr#smb#vtt#shruti_sinha#satender#hashj#sgr09#shej#NTM#manaan#laughing_soul@mirakee @mirakeenetwork @mirakeewriter -
sagar_09 34w
#sgr09
क्षणभंगुर !
शब्द कशाला माणसाचा
मी अपुला कुत्रा पाळतो ,
थेंब हवा कुणा पावसाचा
मी अपुला अश्रू ढाळतो !
फुलं कशा देवा चढवू
मी माझा जीव माळतो ,
तेल फुका पणतीत ठेवू
मी माझा मला जाळतो !
वर्षा कामाची देह भिजला
आत्मा उगा एकटा वाळतो ,
काळ कधीचा दारी आला
आत्मा उगा वेळ टाळतो !
चाळण झाली पुरती माझी
तरी अजूनही व्यर्थ चाळतो ,
निजली निवांत काया माझी
तरी अजूनही रक्त गाळतो !
©अज्ञातवासी.
-
वरात दे !
सोयीनुसार सदैव साथ दे
मरणोत्तर सोडून कात दे !
जमेल तेव्हा हसून पाहा
खुशाल दुःखाला दात दे !
घिरट्या मार तुटून पड
समोरासमोर ती मात दे !
जप रे नशिबाच्या ओव्या
अखेरीस कर्माला हात दे !
चालू राहूदे मुखवटे डाव
पाठोपाठ सदैव घात दे !
किरणे बिछाना नव्हे ऊन
उशाशी स्वप्नांची रात दे !
जरूर नाचेल मीही तेव्हा
एक शेवटची वरात दे !
©अज्ञातवासी -
अज्ञानी !
मावळला सुर्य
संगतीला चंद्र
तरी का हा जीव
अज्ञानी अंधारात !
काळोखाचा वारा
भयाचा सुगंध
मानवी हा देह
भ्याड नपुंसक !
किती काय बोला
किती काय सांगा
करी खरे स्वतःचे
कोटीचा हो मूढ !
चाले वेडेवाकुडे
करी दुःखाशी सलगी
सोयीनुसार करी
आपली सोयरे निश्चित !
भाग्य म्हणे माझे
कर्म न तो करी
रिताच तो राही
विना आत्मज्ञानी !
©अज्ञातवासी -
sagar_09 54w
येण्याने तिच्या !
नकळत होऊन जाते
नाते नवेच बनू लागते ,
ओठांवरती आपल्या मग
हसू नवेच खुलू लागते !
सारे जग आपणास
निराळेच भासू लागते ,
येण्याने कोणाच्या
आपले जीवनच बदलू लागते !
आरश्याशी आपली मैत्री
हल्ली घट्ट होऊ लागते ,
काव्यमय सारेच मग
आपणास वाटू लागते !
मुकपणेच संवाद साधणे
आपणासही जमू लागते ,
येण्याने कोणाच्या
आपले जीवनच बदलू लागते !
रंगहीन चित्रही आपणास
रंगीत ते दिसू लागते ,
कोमजलेले ते फुलही
पुन्हा नव्याने उमलू लागते !
अवकाशापरी जीवनात आपल्या
नवीच चांदणी चमकू लागते ,
येण्याने तिच्या
आपले जीवनच बदलू लागते !
©अज्ञातवासी
#sgr09।। येण्याने तिच्या ।।
( मथळा पाहा )
©अज्ञातवासी -
sagar_09 54w
" विसावा ! "
नऊ महिन्यांच्या शोधानंतर
अस्तित्वाचा सुगावा लागतो ,
जन्मताच आपल्याला मग
आवाज रडण्याचा करावा लागतो !
पडत पडत , रांगत रांगत
धडा जीवनाचा शिकावा लागतो ,
काहीएक करण्याआधी
चटका तव्याचा लागावा लागतो !
पहिले पाऊल टाकण्यासाठी
आधार भिंतीचा घ्यावा लागतो ,
बोबडे बोल उच्चारण्यासाठी
आवाज श्रीचा ऐकावा लागतो !
एकदोन अन् बाराखडी सोबत
घास गणिताचा खावा लागतो ,
रडत रडत मग आपणास
मार्ग शाळेचा धरावा लागतो !
मित्र मैत्रिणी अन् शिक्षक
आदर नात्यांचा राखावा लागतो ,
हसत खेळत आपणास तो
संवाद प्रेमाचा साधावा लागतो !
होते कॉलेज मिळते डिग्री मग
मांडव लग्नाचा उभारावा लागतो ,
एकमेकांच्या मग सोबतीने
रथ कुटुंबाचा ओढावा लागतो !
असेच कायम दौडत राहून
आवाज टापांचा करावा लागतो ,
अंती मात्र आपणास हो
श्वास अखेरचा मोजावा लागतो !
गेल्यानंतर आपणास मग
विधी स्वतःचा पाहावा लागतो
सरण्यावरच्या ह्या प्रवासात
आधार "विसाव्याचा" घ्यावा लागतो !
©अज्ञातवासी
#sgr09।। विसावा ।।
( मथळा पाहा )
©अज्ञातवासी -
भटकंती !
वाट अंधारी , कोणास तारी
लाट किनारी , सर्वांस मारी !
रक्ताच्या गाठी , कडवट नाती
पोकळ लाठी , होतेच माती !
क्षणात इथे , क्षणात तिथे
सर्वची रिते , सर्वची रिते !
खोटा विचार , खोटा संसार
देई हुंकार , देई हुंकार !
चेहऱ्यावर मुखवटा , किती रंगछटा
खालीची राहतो , आयुष्याचा ओटा !
गारच वारा , आठवणींच्या गारा
कुणाचा असतो , मनावर थारा !
जायी हिंडावया , पाय बावळी
नित्यची फसवे , मन चांडाळी !
अवगुणी देह , सदगुणी कोण
संत म्हणती , तुच ओळख !
अंतरीच देव , तरी धडपड
व्यर्थ भटकंती , तुझी वणवण !
©अज्ञातवासी -
sagar_09 54w
आपलं म्हणणार असावं !
कधीतरी वाटतं आपलंही ते पहिलं
आणि शेवटच प्रेम असावं ,
कधीतरी वाटतं आपल्यालाही कोणीतरी
आपलं म्हणणार असावं !
कधीतरी वाटतं असावं आपलंही कोणीतरी
ज्याला फक्त आपल्यातच त्याच विश्व दिसावं ,
ज्याच्यासाठी आपणही दिवसरात्र झुरावं
न सांगता त्यानेही आपल्या मनातलं सारं ओळखावं !
कोणीतरी आपलीही घरी वाट बघत असावं
त्याच्यासाठी आपणही लवकर काम आवरावं ,
आयुष्याचे गीत दोघांनी मिळून सुरेल बनवावं
अलगद आपण त्याचच ते होऊन मग जावं !
त्याच्या सोबतचा प्रत्येक क्षण ह्रदयात साठवावा
नजरे नजरेतच एकमेकांशी संवाद प्रेमळ साधावा ,
मुकपणेच कित्येक संभाषणे आपली व्हावी
शब्दांची उणीव कोणास कधी न ती भासावी !
कधीतरी वाटतं आपलंही ते पहिलं
आणि शेवटच प्रेम असावं ,
कधीतरी वाटतं आपल्यालाही कोणीतरी
आपलं म्हणणार असावं !
©अज्ञातवासी
#sgr09आपलं म्हणणार असावं !
( मथळा पाहा )
©अज्ञातवासी -
आलाप !
नवी पहाट नवीच आशा ,
उजळून गेल्या दाही दिशा !
निळे आकाश निळाच सागर ,
सोन्याने सजला धरणीचा नांगर !
सोनेरी किरणे धरणीवर आली ,
वसुंधरा पुर्णतः सुवर्णमय झाली !
झाले चैतन्यमय वातावरण सारे ,
समृद्धीचे वाहले मग वारे !
काळोखाचा तो अंत झाला ,
भटका जीव शांत झाला !
सारेजण एकत्र हो आले
तारे भूमीवरच चमकू लागले !
हातात दिला जेव्हा हात
विश्वासाचा झाला मिलाप ,
एकाच सुरात गायला तेव्हा
एकजुटीचा तो आलाप !
©अज्ञातवासी -
हनुमान !
गेलेला भूत , येणारा भविष्य , चालू मात्र वर्तमान असे
क्षणात घडे क्षणात बिघडे , काळ भलताच गतिमान असे !
नाना तऱ्हेचे जीव क्षितीवर , नवखंड अन् सप्त ते सागर
एक तिथे संशयाचा पुतळा , मूढ अज्ञानातच रममाण असे !
निळा रंग , विशाल महाकाय , अथांग असा तो महासागर
शांत दिसला किती जरी , अंतरी लाटांचा थैमान असे !
मोहाच्या वाटा अनेक इथे , मोह त्यांचा कदापि न सुटे
अवकाळी पाऊस , तडाखा ऊन्हाचा , भ्रमिष्ट सारे हवामान असे !
चार भिंतीच्या आत लपून , कित्येक वार करतात विषय
त्यांना ही जो हरवून दाखवी , तोच खरा शक्तिमान असे !
बदलले आहे चक्र सारे , उधळे चित्रविचित्र रंग चोहीकडे
कोण भाऊ न् कोण दादा , कशाचा इथे अनुमान असे ?
कलियुगाच्या ह्या जाळ्यात , कैक आपला श्वास आवळे
एक तेथे निर्धास्त चाले , तो भक्त रामाचा "हनुमान" असे !
©अज्ञातवासी -
हाव !
कितीही काही झाले तरी , फरक कोणाला पडत नाही
सोडून गेला कोणी जरी , कोणाचे काही अडत नाही !
निरंतर धावण्याचा खेळ , अवघा असाच चालू राहतो
सडले एखादे फळ जरी , सबंध झाड काही सडत नाही !
सात्त्विकाला येथे मतिमंद म्हणतात , म्हणतंही असतील
मतिमंद ते सारेच आहे , जे कोणासाठीही रडत नाही !
भंगली स्वप्ने , सुटले हात , सुटले सारेची आता
शेवट निकट आला जरी , मनासारखे काही घडत नाही !
कितीही टाळे लावले , कितीही खोलात फेकले आपण
तरी सत्य जीवनाचे ह्या , काहीएक दडत नाही !
वृद्ध झाले , थकले आता , दुरावले सारे आप्तेष्ट
तरी ती "हाव" आतली , ती काही झडत नाही !
©अज्ञातवासी -
गझल !
अनिश्चित काळाचे रहस्य , जर सर्वांना कळले असते
कोणी त्याचे भय , मनी मग बाळगले असते !
सहज कोणीही चालले असते , त्या पाण्यावरती
पोहण्यासाठी हातपाय , का मग वळले असते !
दिवसानंतर रात्रच ती जर , झाली नसती
प्रकाशाचे महत्त्व कसे कोणाला , ते पटले असते !
एकच विचार जर सर्वांचा , झाला असता
कसे इतके शोध नवनवीन , ते लागले असते !
सर्वच सर्वांतला जर ज्ञाता , माणूस असता
का म्हणून त्याने देवाला , मग पुजले असते !
©अज्ञातवासी -
अज्ञानी !
कसा असा तु कोणाच्या , बोलण्यात आला
चालला होता पुढे तु , का माघारी परत आला ?
श्वानापरी अवस्था तुझी , तुच करून आता
शेपटी तुझी उंचावून , दुसऱ्यावर भुंकत आला !
समजावून स्वतःला , किती तू थकला आता
तरी का विसरून सारं , तु पुन्हा पळत आला !
सुटला होता तु रे , आयुष्याच्या खेळातून
पुन्हा त्यात अडकूनी , इकडेच रांगत आला !
जीवनाच्या कागदावर , शाई अज्ञानाची ओतून
स्वतः स्वतःलाच हरवण्यास , "अज्ञानी" तु हसत आला ! ©अज्ञातवासी -
चारोळी !
शोधत होते मन सूर त्या नदीकाठी
जेथे कधी सूर मारीचे खेळ चालायचे ,
ऐकत होते गाणे जे असायचे सर्वांच्या ओठी
त्या आपलेपणाच्या स्वरांनी मन चिंबचिंब भिजायचे !
©अज्ञातवासी -
sagar_09 55w
" अ " ~~~~~
एक असतो 'अ'
ज्याच्या पुढे कोणी तो नसतो ,
पण त्याच्यामागे
साऱ्या सृष्टीचा "व्याप" असतो !
त्या 'अ' ची असते
अफाट हो शक्ती ,
त्याच्यापुढे चालत नाही
कोणतीही ती "युक्ती" !
मृतास कधी तो
अमृत पाजतो ,
चल जीवास तोच
"अचल" करतो !
त्या 'अ' चा असतो
सारा खेळ निराळा ,
दरवेळेस निघतो
"अर्थ" तो वेगळा !
समर्थ कितीही असला तरी
असमर्थ तो बनतो ,
त्या 'अ' च्या विस्मरणाने
धर्माकडूनही "अधर्म" घडतो !
त्याच्या प्रत्ययाचा प्रत्यय
वेळोवेळी तो येतो ,
तरी त्याला मानण्यास
हा मूढ "अमान्यता" दर्शवतो !
पण तो 'अ' मात्र
अढळ , अनंत , अखंड असतो ,
हा तो 'अ' तोच तो
अकल्पनीय असा "अच्युत" असतो !
©अज्ञातवासी
#sgr09 #marathi~~~ " अ " ~~~
( मथळा पाहा )*
©अज्ञातवासी -
गतिमान !
गेलेला भूत , येणारा भविष्य ,
चालू मात्र वर्तमान असतो
क्षणात घडते , क्षणात बिघडते ,
काळ भलताच गतिमान असतो !
©sagar_09 -
Hard but not impossible !
©sagar_09 -
sagar_09 57w
झेप घे.....
अरे थांब थांब जरा
ऐक रे माझं
धावू नको उगाचंच
जरा ऐक माझं
आईला , बाबाला
की साऱ्या जगाला
नाही नाही म्हणता
तू फसवतोय स्वतःला
मुखवट्या मागे तू
स्वतःला दडवू नकोस
जिंकण्यासाठी तू
स्वतःला गमवू नकोस
झेप घे झेप घे
झेप घे झेप घे.....
झेप घेतल्याशिवाय
सामर्थ्य कसे कळणार
अपयशी झाल्याशिवाय
हातपाय कसे वळणार
झेप घे एकदा तू
ऊंची ती गाठ
लोळू नको खाली
कर कंबर ताठ
राहू नको तू
अज्ञानात असा
घे हाती लेखणी
अन् उमटवं ठसा
झेप घे झेप घे
झेप घे झेप घे.....
विश्वास स्वतःवर
स्वतः तू ठेव
हाताने स्वतःच्या
स्वतः तू जेव
आता इकडे नको
आता तिकडे नको
केलेल्या चुकांची
पुन्हा उजळणी नको
स्वतःलाच आता
तू नीट पाहा
गड तुझा आता
तू लढवत राहा
झेप घे झेप घे
झेप घे झेप घे.....
बोलायला आहे
खूप वेळ तुला
ऐकायला मात्र
नाही उसंत तुला
क्षणभर का होईना
सावर स्वतःला
ऐक जरा माझं
आवर मनाला
फडफड पंख तुझे
घे भरारी आता
ऊंच त्या आकाशी
जा तू आता
झेप घे झेप घे
झेप घे झेप घे
एकदा का होईना
पण तू झेप घे.....
©अज्ञातवासी
#sgr09 #marathiझेप घे !
झेप घे झेप घे
झेप घे झेप घे.....
©अज्ञातवासी -
sagar_09 58w
कोण मी ?
विचारलं स्वतःला एकदा की
खरचं कोण आहे मी ?
जो धावतोय , जो पडतोय
तरी परत उठून पुन्हा फसतोय
तर कधी निघतोय दूरवर
मुठीत अपेक्षांची वाळू भरून
असा मुर्ख माझ्यासारखा
आहे का कोण अजून ?
चर्मचक्षूंवर लावूनी मायावी झापडे
हाती घेतोय अज्ञानाचे फावडे
नकोनको ते सारेच मी उकरतोय
स्वतःला मी स्वतःच आता गाडतोय
जातोय भटकायला विचारांच्या त्या गावी
गातोय मी माझ्याच अपयशाची ओवी
पण हे सर्व काही माझेच आहे का ?
हा प्रश्न कायम अनुत्तरीतच राहतो
काही मज कळत नसताना
मी मात्र कायम दौडतच राहतो
अंती पुन्हा चोहीकडे बघितल्यास
काहीच मज न घावते
खरचं कोण मी च्या शोधात
हे मन उपेक्षितच राहते !
©अज्ञातवासी
#sgr09 #marathi।। कोण मी ।।
( मथळा पाहा )
©अज्ञातवासी -
_bahetiankita 58w
चलो आज कुछ नया कर के देखें
चलो आज कुछ नया कर के देखें
बड़ी एकरंग हो गई है ज़िन्दगी
कुछ नए रंग अलग अंदाज़ में भर के देखें
चलो आज कुछ नया कर के देखें
जो आज कोई दे बिन बात ताना या करे गुस्सा
तो उस पर बिना हताश हुए, हंस कर के देखें
चलो आज कुछ नया कर के देखें
जो आज कोई काम बिगड़े या नुकसान हो
तो लोगों को बिना गुस्सा किए, माफ कर के देखें
चलो आज कुछ नया कर के देखें
जो आज कोई अपना लाचार, रोता दिखे कहीं
तो बिना कुछ पूछे, जाने, उसका साथ निभा कर देखें
चलो आज कुछ नया कर के देखें
जो आज कोई बड़ी खुश खबरी मिली हो
तो अनजान ज़रूरमंदों को उसका हिस्सा बना कर देखें
चलो आज कुछ नया कर के देखें
जो आज कोई मुसीबत आन खड़ी हो
तो बिना कोसे, ईश्वर पर भरोसा कर, धन्यवाद देकर देखें
चलो आज कुछ नया कर के देखें
मिला मानव जीवन, प्रेम और विश्वास बढ़ा ने को
तो आओ उसे, आज सार्थक कर के देखें
चलो आज कुछ नया कर के देखें
©_bahetiankita