#marathi

2585 posts
 • mrfluidic 7h

  मातृभाषेबद्दल लाज नाही, तर माज असलं पाहिजे

 • hopefull_soul 1d

  ©hopefull_soul

 • aaditi_ 3d

  Translation-
  माँ के बारे मे लिखते समय शब्द अपर्याप्त क्यो हो जाते है?
  और पिताजी के बारे मे लिखते समय आँखो से पाणी क्यू आ जाता है? इन सवालों का जवाब धुंडणे मे ही इस लेखिका की पुरी जिंदगी निकल जायेगी....
  - आदिती शिंदे...

  If you want in English now �� go and search on google me chali pdhne...

  Kya aapne socha tha ki me likhungi nahi��
  Ye vichar sirf notes aur kagazon me likhne ke liye nahi bane...

  #marathi
  #i_am_a_day_dreamer ��

  Read More

  ✍️

  आई बद्दल लिहिता लिहिता शब्द अपुरे का पडतात?
  आणि बाबांबद्दल लिहायला घेतल्यावर डोळ्यातून पाणी का येत? याचं उत्तर शोधण्यातच अख्ख आयुष्य या लेखिकेच निघून जाणार आहे....
  -आदिती शिंदे...

 • sanjeevanik 4d

  तेज

  जे लोक नुसतेच नावाने नव्हे पण आपल्या कर्माने आणि कर्तुत्वाने मोठे असतात त्यांच्या मुखावरील तेज अनन्यसाधारण असते ..
  ©sanjeevanik

 • words_flake 4d

  खोट बोलून मुंग्या गोळा
  करायची सवय नाही आम्हाला..

  ©nehabhavsar_quotes

 • kalp_cloud 1w

  Collab

  ©kalp_cloud

 • smartsam 1w

  निकीता!

  आंब्याला जणू
  लागलाय मोहर!
  असाच सुंदर "निकु" तुझ्या
  ज्वाणीचा बहर!

  केस काळे लांब
  गोरा गोरा चेहरा!
  त्यात गजरा मोगऱ्याचा
  तुझ्या केसात साजरा!

  तूच माझं प्रेम
  तूच माझी कविता
  तूच माझी राणी
  तूच माझी निकीता!

  ©SmartSam

 • smartsam 1w

  यहोवाची किमया!

  नाजूक तुझा बांधा
  कोरीव तुझी काया!
  अदभुत सृष्टी अशी
  मोहक अती प्रिया!

  कंबर किती नाजूक
  हर कटाक्ष बघते लाजून!
  अंबरापरी सुंदर
  राहतेस प्रिये अभी
  पदर जेंव्हा घेऊन!

  नयन किती प्रांजळ
  स्मित फुलापरी अनमोल!
  अनंत आभार देवाचे
  किती अनमोल असीम
  यहोवा देवा तुझी किमया!

  ©SmartSam

 • vipin_vn 1w

  #Mirakee #Marathi Quotes # 16/Feb/2021#
  # 20:24 #

  Read More

  रंगमंच..

  आयुष्य एक रंगमंच
  नाट्य कोणतं, नी पात्रे
  ही ठरतात आधीच
  काय केंव्हा कुठं कसं
  घडणार हे सगळं ठरलेलंच
  महानाट्य हे सृष्टी संचालनाचं
  आपण सर्व त्या व्यक्तिरेखांपैकीच
  निर्गुण निराकार निर्देशकही तोच
  सर्व त्याच्या बोटांवर नाचणारीच
  आपण सारे कळसूत्री बाहुल्याच
  पात्र वठवायचे आहे तेही हुबेहुबच
  मनात असो वा नसो, न बोलताच
  अभिनयातच जगायचं नी त्यातच मरायचं...
  ©vipin_vn

 • mahi_ghane 2w

  Happy valentine day❤️(थोड़ा लेट हो गया)
  But it's not too late because every day is valentine day❤️
  #love #prem #Mirakee #poems #poetry #writersnetwork #writersofinstagram #writersofig #stories #writing #words #marathi #prem #quote #ttt #quoteoftheday #writersofmirakee

  Read More

  प्यार छुपाएं नहीं छुपता
  फिर तुम दूर हो या पास हो
  अजनबी हो या खास हो
  बात सिर्फ इतनी हो कि
  तुम्हारी गैर मौजूदगी में भी तुम्हारा एहसास हो।
  ©mahi_ghane

 • p_pranali 2w

  "काही अडतं का ग प्रेमाशिवाय?"

  "माहिती नाही. पण माझं अडतं जेव्हा तू नसतेस.
  उगीच काळजी वायला लागते तुझी. मला तर तुझ्याशिवाय गमत सुद्धा नाही.
  जर आपल्या मैत्रीला प्रेम म्हणतात तर नक्कीचं अडतं प्रेमाशिवाय, तुझ्याशिवाय."

  ©p_pranali

 • p_pranali 3w

  सुखाच्या सरीत तर सगळेचं सोबतीला असतील,
  दुःखाच्या लाटांमध्ये सोबत वाहू देशील कायं ?
  प्रेमाच्या ओंझढीतं मोत्या प्रमाणे जपून ठेवेल,
  सांग तू माझा होशील कायं ?

  -Pranali

  #marathi #marathiquotes

  Read More

  सुखाच्या सरीत तर सगळेचं सोबतीला असतील,
  दुःखाच्या लाटांमध्ये सोबत वाहू देशील कायं ?
  प्रेमाच्या ओंझढीतं मोत्या प्रमाणे जपून ठेवेल,
  सांग तू माझा होशील कायं ?

  ©p_pranali

 • smartsam 3w

  तुझ्या साठी!

  एक चित्र सुंदर पाहिलं
  मन जडून त्यावर राहील!
  वेळ काढूनच जणू यहोवाने
  हे प्रत्यक्ष सुंदर कोरल!

  डोळे मोठे काळेभोर
  गाल मऊ उबदार!
  गोडगुलाबी खांद्यावर
  मखमल केसांची जशी झालर!

  दिवस नवा आला
  अंधार निषेचा गेला!
  मन मनात हर्षले माझे
  एक चेहरा सुंदर आज पहिला!

  तुझी स्मृती मनात राहिली
  क्षणापासून ज्या तुला मी पाहिले!
  हे काव्य मधूप्रिये
  तुझ्याच साठी मी वाहिली!

  हे काव्य मधूप्रिये
  तुझ्याच साठी मी वाहिली!


  ©SmartSam

 • vasubandhu 3w

  ©Vasubandhu

 • amiii_26 3w

  प्रेम

  प्रेमाचं नातं जुळल आपलं
  बदललं माझ जग
  सहवास तुझा हवाहवासा वाटतो
  तुझ्या विचारात हरवून जाते मग

  आल जरी वादळ या प्रेमात
  तरी दूर नको जाऊस
  समजून एकमेकांना
  हात हातात धरून एकत्र राहू

  ©amita_26

 • smartsam 3w

  सुखी रहा !

  लक्षात ठेवा नेहमी
  आपले भावनिक स्वातंत्र्य.
  नम्रपणा जीवनात आणी
  गरीब ही मित्र!

  विसरू नका कधी
  आपली वायत्तिक जबाबदारी.
  तसच सकाळचा चहा,
  नाष्टा आणी न्याहरी!

  भेटा त्यांना
  जे असतील गरजवंत!
  सगळ्यांवर करा प्रेम नाही फक्त
  सुंदर आणी श्रीमंत!

  लक्षात असो नेहमी
  आपल्या जीवनाचा उद्देश!
  कार्य करा मेहनतीने
  होऊ दे तुमचे लक्ष सिध्दीस !

  जाण ठेवा आपली
  माणूस असण्याची!
  एखाद्याला जमेल ती
  मदत करण्याची!

  नम्र, प्रेमळ आणी प्रेम भाव ठेवा!
  आनंदी, समाधानी आणी स्वस्थ रहा!
  उद्याचे तथ्य आजच डोळ्यात पहा.
  जीवनाचा ओळख उद्देश!
  आनंद घ्या
  सदा सुखी रहा !

  ©SmartSam

 • smartsam 3w

  अंजली!

  बाजूला माझ्या उभी
  जी तू राहीलीस!
  साजली अंगावर माझ्या जणू
  तुझ्या केसांची सावली!

  सार शहर फिरलो
  एकच मला पावली!
  तुझ्या सारखी साजरी
  एकच तू अंजली!

  अबोल तुझे डोळे
  गोड गोफेल चेहरा!
  हळुवार समीप तुझ येणं
  पण आता माझ्यावर ही पेहरा!

  नाजूक तुझा बांधा अन्
  मनात लपलेली भावना!
  पाहिल्या विना तुला
  आता अंजु मला राहवेना!

  अमावस्या च्या ही राती
  उगवला जणू चंद्र!
  अलगद तुझी पावलं अंजु
  करी मला मंत्रमुग्ध!

  तुझ्यात माझ्यात अंजु
  आता अंतर नको हे!
  अलगद लाजात समीप
  राणी जवळ माझ्या तू ये!

  उमलली एक नाजूक कळी
  एव्हाना फुल नाही फुलले!
  आठवणीत अनंत
  अंजु माझी अंजली
  अबोल तुझ प्रेम
  अनंत दडून राहिले!

  अंजु!


  ©SmartSam

 • p_pranali 6w

  एक नातं होतं माझं, माझ्या हृदयाशी.
  विश्वासाचं, हक्काचं, प्रेमाचं.
  ज्यात त्यानी मला नवीन नात्यांची ओढख पटवून दिले.
  खूप गोड वाटायचा यांचा सहवास,
  आणि मी सुद्धा पूर्णपणे रमून गेले.
  नात्यांचा लाटांमध्ये वाहून खूप दूर निघून आले,
  जिथनं मागे वढून बघितलं तर फक्त अनुभवांचा भार होता.
  चांगले अनुभव हृदयस्पर्शी ठरले व वाईट दुःखद.
  काट्यात अडकलेला कापड सोडवता येतो,
  पण भावनेत गुंतलेलं मन नाही.
  त्रास फक्त हृदयालाच,
  जो क्षणो-क्षणी तुटतो अपेक्षेच्या ओंजळीत लपून,
  भावनेला सहारा देऊन.
  सोडून दिलं हृदयानी अपेक्षा ठेवणं,
  आणि मी विश्वास.
  कारण अश्रूंची शिकवण होती कोणीच कुणाचं नसतं.

  ©p_pranali

 • tanmay5 7w

  छत्रपति शिवाजी

  सह्याद्रि के पर्वत से उठ गई प्रचंड जवाला थी,
  आदिल शाही के हृदय में मची डर की छाया थी,
  औरंगज़ेब भी थर्राया था, कुतब शाह भी काँपा था,
  शिवराय की शक्ति का नित्य सकल बोलबाला था।
  ©tanmay5

 • smartsam 7w

  माझ गाव!

  अलगद झुलणारी फुल
  आठवणींचा ठेवा!
  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!

  निळनिळ आकाश
  सूर्य किरणांचा प्रकाश!
  अजुन ही आहे बऱ्याच
  लोकांत विश्वास!

  गुलमोहराचा वाफा दादा
  न्याहळून तर पहावं!
  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!

  झुकलेली नारळाची झाड
  संथ वाहे शुद्ध हवा!
  जिकडे तिकडे
  हरवगार रान तुम्ही पहा!

  आमरस गोड गोड जणू प्रेमाचा घास
  गाव सर फिरू, आनंदान पाटावर पोहाव!
  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!

  सुशिक्षित लोक, हसत खेळत लेकर
  गाई, म्हशी, कोंबड्या, बकऱ्या अन् मेंढर!
  हिरवगार रान, बघा फुलांचा बहर
  शहरा वाणी नाही दादा
  मनभरून आमच्या कडे राहावं!
  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!

  पाटावर जाऊ, ऊस वाटेत तोडून खाऊ.
  मोर ही आहेत रानात, झुंड पारव्यांचा पाहू!
  माझं गाव खूप सुंदर,
  जिकडे तिकडे प्रेमाचा साजार!
  गवतावर झिरपत मोत्या सारख दवं
  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!

  सुखात नांदती सूना
  नंदा, जावत नाही काही उना!
  घराघरात माया
  प्रेम भावाभावतल पहावं
  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!

  लोक आहेत साधी
  पण प्रेम आहे खूप!
  नाही मिळणार दादा
  कोंडलेल्या शहरात अस सुख!
  निसर्गाच्या सानिध्यात मिसळून तर पहावं!
  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!

  जास्त नाही मोठ
  आहे तस छोट!
  रातराणात अलगद काजव्यांचा प्रकाश
  पहाटे पहाटे ऐकावी
  किलबिल पाखरांची गोड!
  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!

  नाही काही प्रदूषण
  नाही गर्दी कोंडीच दडपण!
  घरी अंगण सरपण
  घरा समोर पटांगण.
  प्याव गोड पाणी
  थंड भरलया रांजण!
  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!

  फेटा, लुगड, खमिज
  आहे जुनी ठेव!
  चावडी, बाझार, हिरवं रान!
  हिरवगार वावर, चुलत्या सारवती अंगण, वहिनी मोडती सरपर्ण.
  सर्वीकडे प्रेम, आनंद पहावं!
  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!

  खूप आहे सुंदर माझं गावं
  एकदा तरी पाहुण आमच्या
  गावाला यावं!
  करू सगळी सोय
  तुम्ही हो तर म्हणावं!

  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!
  एकदा तरी पाहुंण आमच्या
  गावाला यावं!

  ©SmartSam