ganeshbhujbal

ga_nesh6359 instagram id

Grid View
List View
Reposts
 • ganeshbhujbal 10h

  खयाल

  बेवजह हम भी मशगूल हुए
  ख़्वावो के तेरे मंजर में।
  बहोत दूर है तू वर्षा के जैसे
  कहि छिपी आसमान में।

  हम भी शिद्दत से मरने लगे
  तेरी मेहकती अदाओपे।
  उम्र का दोष कैसे कहा जाए
  खुद हम भी भूल गए।

  आपके कशिश में लिखने की
  अब आदत हुई है हमे।
  आप भी जानकर ये सब कुछ
  क्यो अनजान बन हे।

  ये दर्द में छिपी इस ज़िन्दगी के
  सवाल ढूंढ रहे है।
  बहोत कुछ नही हम ज़िन्दगी में
  तेरे खयाल ढूंढ रहे है।
  ©ganeshbhujbal

 • ganeshbhujbal 1d

  साया

  जी रहे है हम ज़िन्दगी
  तेरे गम के साये में।
  तू मिली ही नही कही
  पाने की चाहत में।

  दरबदर ढूंढा तुझे हमने
  जिंदगी की चाहत में।
  दिल को समज़ाए अपने
  पराये तेरे दर्द में।

  वादों को निभाए चल रहे
  कभी किये थे तुमने।
  तुम तो भूल गए सारी कसमे
  रस्मो की जज्बातो में।

  बेवजह क्यों हम गिर पड़े
  बेवफा तेरे सपनो में।
  जी रहे है मुकद्दर समझ के
  तनहा मेरे अपनो में।

  दोष क्या है मासूम दिल के
  छीना वो प्यार तूने।
  निभानी ही नही थी कसमें
  क्यो थी वादों की रस्मे।

  ©ganeshbhujbal

 • ganeshbhujbal 2d

  भान

  आत कुठे उरलय कशाचं भान
  जगायचंय फक्त बेफाम होऊन

  जगाच्या चौकटीत अडकलेलं
  मला सोडवायचय मरणाच भान

  ते ते तर येणारच आहे कधीतरी
  मग आजच का जगायचं मरून

  क्षण क्षण ते जवळ येतच आहे
  मग जगून घ्यायचं होऊन बेफाम

  प्रत्येक क्षणा क्षणात अस्तित्वाचे
  मोहरलेले सोनेरी रुपेरी क्षण ठेऊन

  उद्याची उगाच चिंता करून जगणं
  आता नको आहे अस रोजच मरण

  या आनंदाच्या कुशीत डोकं ठेऊन
  आता मला विश्रांत व्हायचंय निवांत

  फिकीर चिंता सार सार दूर सारून
  विसरायचय या बेगडी जगाच भान

  ©ganeshbhujbal

 • ganeshbhujbal 4d

  अर्थ

  तुझ्याविन शब्दांना या अर्थ
  काही लागत नाही
  जुळवतो बर्याचदा शब्दांना
  शब्द जुळत नाही

  यमकाच्या मर्यादा ओलांडून
  शब्द स्थिरावत नाही
  अर्थाचे गणित शब्दांना या
  लागू पडत नाही

  क्रिया प्रतिक्रिया व्यक्त जरी
  शब्द व्यक्त होत नाही
  काळाच्या मर्यादेत हेच शब्द
  बंदिवान होत नाही

  मदारी बनून खेळवले कितीही
  शब्द काही आघत नाही
  मर्यादाच्या कुंपणात बांधू म्हटलं
  शब्द सापडत नाही

  शब्दाच्या साम्राज्यात जगूनही
  शब्द मिळत नाही
  शब्दाची मागूनही भीक आता
  तीही मिळत नाही

  तुझ्यावीण शब्दाचा रुसवा या
  कोणी काढणार नाही
  बंधनात बांधायला या शब्दांना
  शब्दभ्रमकार मी नाही
  ©ganeshbhujbal

 • ganeshbhujbal 5d

  मरण

  जगण्याचे स्वप्न पाहताना
  जगणंच विरून गेलं
  स्वप्नाच्या पाठलाग करताना
  स्वप्नच भंगून गेलं

  जे न मिळालं कधीच मला
  मन त्यात रमून गेलं
  दुःख सागरात अपेक्षांच्या
  मन मात्र डुंबून गेलं

  जे जे मिळालं अप्रूप त्याला
  करायचं राहून गेलं
  न मिळालं कधी दुःखात त्याच्या
  जीवन वाहून गेल

  सुखाच्या बदलत्या परिसीमा
  समाधान राहून गेलं
  जगणं इथे उरलं थोडं थोडक
  मरण मात्र येऊन गेलं

  क्षणोक्षणी विस्मरणात तारुण्य
  उगा असच वाहून गेले
  अपेक्षांच्या हिंदोळ्यावर झुलताना
  जगणंच सार राहून गेलं
  ©ganeshbhujbal

 • ganeshbhujbal 1w

  अधम

  जो जो जनन जाहला। तो तो मृत्यूशी पावला।।
  कोण्या कर्मे कोण गेला। गतिशी त्या प्राप्त जाहला।।

  शोक कैसा न कळवळा। कलियुगी मनुष्य मातला।।
  जयाचे दिनू भरले। तया न्याया काळ आला।।

  व्यर्थ शोक शोकसभा। सारा व्याप काय कामा।।
  जितेपनी प्रेम द्यावे घ्यावे। काय त्याचे मैताला।।

  कोणी नसे कोणाचा। जयाने तयाचा भार वहावा।।
  पळभर करुनि हाय। विसरुन सार लागे कर्माला।।

  कोणी नसे इथे कोणाचा। लोभ हा जितेपनी जपावा।।
  चंदन परिमळ मैताला।सोयरे सुतक न तयाला।।

  आव कैसा दाखवी जगा।बोंबलून सांगशी जगाला।।
  न करे करणी तरीही। मीच केले सांगे मयताला।।

  कैसा कैसारे माणसा। कलियुगी कैसा भरकटला।।
  कर्मे नीच करता करता। अधम नीच तू जाहला।।
  ©ganeshbhujbal

 • ganeshbhujbal 1w

  रात

  किररररर या रात्री
  जागल्या कैक किती
  अंधाऱ्या या रात्री
  देखील्या नयनी कोणी

  निशब्द अन एकाकी
  सोबती न तिला कोणी
  अभिशाप हा काळोखी
  जणू एकली वाहते ती

  भयाण अंधारी रात ही
  किरकिर रातकिड्याची
  बेसूर भयाण ताण ती
  त्या कावलेल्या कुत्र्याची

  भूत प्रेत अन पिशाचाची
  साथ असे तीस श्वापदाची
  चांद ही देखतो दुरुनी
  आरास करी चांदण्यांची

  मोहक भास क्षणोक्षणी
  रात ही भयाण जरी
  आस लेवून मिलनाची
  रात जागते रात सारी
  ©ganeshbhujbal

 • ganeshbhujbal 1w

  अरमान

  अरमान दिल मे लिए मुझे
  सपनो में जीना है।
  सपने को लिए दिल में मुझे
  ख्वाब देखने है।

  तकदीर को अपनाए मुझे
  चलते जाना है।
  मंज़िल की तलाश में मुझे
  मुकाम पाने है।

  कौन है मेरा जो साथ चले
  अकेले चलना है।
  महफ़िल नही ज़िन्दगी मुझे
  तेरा साथ निभाना है।

  कोई हो या न हो बस मुझे
  तकदीर को पाना है।
  नगमा ए ज़िन्दगी सुनाते सुनाते
  बस चले जाना है।
  ©ganeshbhujbal

 • ganeshbhujbal 1w

  पसारे

  लिहिलेल्या प्रत्येक शब्दाशब्दात
  तुझ अस्तित्व आहे
  कदाचित तू नाहीस सोबत म्हणून
  ओतप्रोत तूच आहे
  शब्दातल्या भावनांचे पसारे सारे
  तुझ्यासाठी आहे
  कळले किंवा न कळले तुला जरी
  शब्दगंध गंधित आहे
  विरहातल्या यातना म्हणशील तर
  तुझ्याच त्या आहे
  मिलन कल्पनांचे मांडलेले डाव
  कोणासाठी का आहे?
  तरीही तू दूरस्थ त्रयस्थ बनून अशी
  अलिप्त का आहे?
  मोकळेपणाने शब्दांना वाहु देतो मी
  भावनाअधीन आहे
  तुझ्या जपलेल्या साऱ्या यातनांना
  शब्दस्वरूप करतो आहे
  अश्रुत वाहून जातात बऱ्याचदा शब्द
  अन निशब्द तू आहे
  जणू रक्ताळलेल्या जखमेवर मनाच्या
  मीठ चोळत आहे
  माझ्या भावनांचे मीच मांडून पसारे
  पुन्हा आवरत आहे

  ©ganeshbhujbal

 • ganeshbhujbal 1w

  शब्दखेळ

  रेशमी या शब्दात सखे
  शब्द शब्दात गुंफतो
  तुझियासाठी मी प्रिये
  काव्य शब्दात गुंफतो
  अनामिक तू मजसाठी
  शब्दासवे तुज भेटतो
  मज कवितेत तुजसाठी
  सहजी प्राण फुंकतो
  जिवंत मज यातनाचे
  जाळे ऐसें मी विणतो
  विरहात तुज प्राणप्रिये
  क्षण क्षण मी झुरतो
  न आकळे शब्द सखे
  तरी शब्दात रेखीतो
  चित्रकार मी शब्दाचा
  शब्दात भाव भरतो
  शापित या प्रेम वेदनेत
  विरहभाव मी दर्शवतो
  विरह प्रीतीत प्राणप्रिये
  शब्दासवे मी रमतो
  नसे आसरा दुजा मज
  शब्दची भाव दर्शवतो
  अंतरीच्या या भावनांचे
  शब्दखेळ सखे मांडतो
  ©ganeshbhujbal