• gajendra 22w

  भक्ताचं आणि देवाच जे निखळ ,प्रेमळ आणि विश्वासू नात दिसत तसाच मैत्रीचं पण असत..
  ना कुठली बंधन ,ना कसली अपेक्षा ,ना कसला भेदभाव ,फक्त नितळ संथ नदी सारखं वाहत जाण पृथ्वी तालावर आस एकच नातं आहे जे जितकं जून तितकं घट्ट होत जानार ..बर या मध्ये ना लिंगाचा भेद ना वयाची आठ ..अभेद्य आस हे नातं आहे ..पण या नात्यात एक गोस्ट ठासून भरलेली हवी .ती म्हणजे एकमेका बद्दलचा विश्वास ..कारण यावरच मैत्रीचं झाड फुलत ,भहरत ,स्वछंद पणे वाऱ्यावर डुलत ,आणि वादळात सुद्धा घट्ट जमिनीत पाय खोचून उभा राहत. तसेच वागण्यात ,बोलण्यात ,मतमांडण्यात मनाची मोकळीक आणि स्वछंद पने विहार करण्याची मुबा हवी ..या दोन बाबी वरच मैत्री ची घट्ट नाळ जुळते मग जगातल्या बाकीचा सर्व बाबी यापुढे दुय्यम ठरतात उदाहरणात पैसा अडका ,श्रीमंती गरिबी ,थोर लहान वगेरे वगेरे ..आणि फक्त अलोबा मालोबाच नाही तर वेळ प्रसंगी खडीबोल सुनावुन योग्य मार्ग दाखवण्याचा अधिकार पण या नात्याला आहे ..तसेपण भगवान
  श्री कृष्णांनी आपला मित्र सुदामा चे पोहे खाऊन हे नातं किती उच्च आहे हे दर्शवले होतेच ..सर्व नात्यातलं आतिउच्चा अस नातं जपाव आणी त्याचा आनंद घ्यावा ..
  @smiley_foreva

  Read More

  मैत्री

  ©gajendra