• satish553 10w

  मातीचे मोल!

  मातीचे मोल तुम्हाला काय कळणार..
  थोड़ा जरी पाय माखला तरी तुम्ही शी शी करणार..
  तुम्हाला त्याचा सुगंध काय कळणार...
  मातीचे मोल तुम्हाला काय कळणार!!!

  मातीचे मोल माझ्या शेतकऱ्याला विचारा..
  इतुशा माती साठी तो राब राब राबतो..
  कधी कधी तर जीव ही गहाण ठेवतो..
  मातीचे मोल तुम्हाला काय कळणार..!!!

  मातीचे मोल तुम्हाला तेव्हाच कळेल...
  जेव्हा छोट्यास्या तुकड्यासाठी वन वन फिराल..
  एक दिवस तरी बिन भाकरीचे मराल..
  तेव्हा तुम्हाला शेतकऱ्यांची किंमत कळेल...
  अन मातीच्या मोलाची गंमत कळेल..
  मातीचे मोल तुम्हाला काय कळणार..!!!

  तुम्ही म्हणतात आम्ही टैक्स भरतो..
  त्याची आम्ही कर्ज माफी घेतो!
  अर एकदा स्वामीनाथन लागू करा..
  टैक्स काय आम्हीच GST भरु...
  अन आमच्या मालावर फिक्स रेटच लेबल धरु...
  मातीचे मोल तुम्हाला काय कळणार..!!!

  देवा तर हा चमत्कार होउदे..
  अन शेतकऱ्याच्या हिताच सरकार येऊदे ...
  शेतकऱ्याच्या हिताच सरकार येऊदे...
  @jit452000
  ©satish553