• mahavirjain 23w

  #my mom birthday ... she not in world ... she pass away before 6 month

  Read More

  आई

  तू असतांना
  उन्हाची तीव्रता कधी
  जाणवली नाही ...
  आता समजलं,
  तुझ्या प्रेमाचा छायेत बसव्याला तू होती.

  आई तू
  असताना
  हरण्याची भीती कधीच
  जाणवली नाही....
  आता जाणवलं,
  हारण्यावर संभाळण्यासाठी तू होती....

  आई तू
  असताना
  आयुष्यात यशाचामागे धावताना पडण्याची,
  भीती कधी वाटलीच नाही,
  आता वाटलं,
  पडल्यावर परत स्वतःचा पायावर उभा करायला
  तू होती...

  आई तू
  असताना,
  मला काही बोलण्याची,
  हिंमत नव्हती कोणाची ....
  आता जाणवलं
  तेंव्हा माझ्या पाठिशी उभी
  तू होती ....

  आता नको चिंता करू...
  वेळ लागला पण
  जमलं तुझ्या बाळाला
  या समुद्रांत पोहयच..
  या स्वार्थी दुनियेत
  आपल्या ध्येयाना कसं गाढायचं,..

  खंत फ़क्त ऐवडीच
  तुझ्या साथ खूप अल्प मिळाला...
  पण या अल्प काळात..
  कल्पवृक्षासारखं सगळं काही देउन गेली तू...

  आठवण येते तुझी तेव्हा,
  रंगून जातो बालपणीच्या आठवणीत..
  बालपणीचा आगाऊपणा देउन जातो प्रत्येकवेळस
  ओठांवर हास्य....
  आणि येते डोळ्यांत पाणी,
  कारण की सगळ्या काही आठवणीच राहून गेल्या...

  पण खरं सांगू आई,
  तू असतांना ...
  जीवन जगण्याची मजाच काही वेगळी होती.....

  ©mahavirjain
  veercreativity.wordpress.com