• thesdspeaks 23w

  Article - 6

  This is an article on
  Topic - || बस स्टॉप ||

  ��️To read all parts of this article use the below hashtag��️

  #BusstopbySD

  ��️To read all articles by me use the below hashtag��️

  #TheSDarticles

  Read More

  बस स्टॉप

  || बस स्टॉप || - भाग 2

  Continued from...भाग 1

  ते लहान मूल हसत असतं... पण आई बाबांकडून दूर जाऊन खेळायचा प्रयत्न करतं. धडपडतं पण पुन्हा त्याचा चेंडू जिकडे गेलाय तिकडे धावत सुटत आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू उमलतं. मलाही माझी ध्येय गाठताना आईचा पदर आणि बाबांचा हात सोडून पुढे जावं लागणार असतं. त्यांचं लक्ष असतं माझ्याकडे पण तरीही पुढचा प्रवास एकट्याचा आहे! ठेचा लागतात तेव्हा पुन्हा उठून ध्येयाकडे धावण्याचा प्रयत्न करायला मी त्या लहान मुलाकडून शिकलो! कदाचित तेव्हा माझा आनंदही त्या बाळासारखा असेल. ज्याचा कोणालाही हेवा वाटावा.
  तरुण प्रेमी युगुलं दिसली; पण आता फक्त त्यांचे हातात घेतलेले हात नव्हे तर त्या मुलीने विश्वासाने खांद्यावर ठेवलेला डोकं पहिलं. अनेक अडचणी एकमेकांशी Share करत असताना एकमेकांना धीर देताना पाहिला. रस्त्याने चालताना हळूच आपली जागा बदलून तिला आतल्या बाजूला करून सुरक्षित करणाऱ्या मुलाला पाहिलंय. बऱ्याचदा त्यांच्यातले राग आणि रुसवे फुगवे पाहिलेत. कधी एकमेकांना चोरून पाहण्याचा त्यांचा खेळही नकळत पाहिलंय. प्रेम हे निव्वळ मजा नाही तर एक जबाबदारी पण आहे हे मी या बस स्टॉप वर शिकलो.
  जी म्हातारी माणसं इकडे आनंदी वेळ घालवताना पाहायचो. आज हळुवार त्याच्या हालचाली पाहायला लागलो. त्यांचे उतारवयात होणारे हाल! काहींचे जुने अनुभव कानावर पडायचे. त्यातून थोडाफार शहाणपण मिळू लागला.

  To be continued...भाग 3

  ©TheSDspeaks