• sk_2805 22w

  आवडतं मला

  आवडत मला तुझ्या आठवणीतही रमायला
  तुला आठवुन हळूच ओठ हलवायला

  आवडत मला तुझ्या आठवणीत रमायला
  आकंठ आपण प्रेमात असतांनाच आठवायला

  आवडत मला तुझ्या आठवणीत रमायला
  तु दिलेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा उघडुन बघायला

  आवडत मला तुझ्या आठवणीत रमायला
  तुझा प्रत्येक स्पर्श आठवत अंगावर शहारे आणायला

  आवडत मला तुझ्या आठवणीत रमायला
  तुझ्या ओठांचे ते ठसे बघत गुलाबी व्हायला

  आवडत मला तुझ्या आठवणीत रमायला
  तुझ्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण पुन्हा जगायला

  आवडत मला तुझ्या आठवणीत रमायला
  तुझा बालिशपणा आठवुन तुझ्याशी मस्ती करायला

  आवडत मला तुझ्या आठवणीत रमायला
  तुझ्या सुटलेल्या हाताला आठवुन पुन्हा हळव व्हायला

  - संदिप कुलकर्णी
  ©sk_2805