• namrata_kamble 6w

  अपराधी ....

  जेव्हा डोळ्यातले पाणी झरझर वाहू लागते .....
  जेव्हा शब्दांशिवाय मनमोकळे बोलावे वाटते .....
  पण समोर त्या क्षणी कोणी नसते .....

  काय करावे समजत नाही .....
  कसे वागावे उमजत नाही .....
  तेव्हा वाटते ... तेव्हा वाटते ......
  नाही,मी अजून जगू शकत नाही .....

  असे हरवून जाणे .....
  मनातल्या मनात उदास राहणे .....
  हसणे विसरून जाणे .....
  आणि रडणे कवटाळून बसणे .....

  कळून चुकले मला .....
  माझ्याकडून नकळत अपराध झाला .....
  माझ्यामुळे माझ्या माणसांना त्रास झाला .....

  अपराधी ही भावना .....
  काही केल्या जाईना .....
  स्वतःकडून झालेल्या .....
  या चुकीवर विश्वास बसेना .....

  त्या क्षणी कळले ,
  जगात सर्वात कटू सत्य म्हणजे
  अपराधी असणे .....
  व्यर्थ आहे असे जगणे ,
  ज्याचे क्षणोक्षणी सांगणे ,
  माझे अपराधी असणे .....

  माझ्या माणसांना त्रास होणे ,
  त्यांचे चेहऱ्यावरचे हसू जाणे ,
  ह्याला कारण एकच ,
  माझे अपराधी असणे .....!

  ©namrata_kamble