• scribbler_jay 46w

  ज्या क्षणी तुला पाहिले,
  मन माझे,माझे न राहिले.
  हरवून जाई हे तुझ्यात पुन्हा पुन्हा.
  का वेड लावीले तु ह्या मना?

  साथ तुझी मना भासते.
  मन मनातच लाजते.
  उमटल्या ह्यावर तुझ्या पाउलखुना.
  का वेड लावीले तु ह्या मना?

  ती अनोखी अदा तुझ्या चालण्यात.
  तो गोडवा तुझ्या बोलण्यात.
  सर्व साधारण वाटे तुझ्यावीना.
  का वेड लावीले तु ह्या मना?

  ©scribbler_jay