• thesdspeaks 22w

  Article - 6

  This is an article on
  Topic - || बस स्टॉप ||

  ��️To read all parts of this article use the below hashtag��️

  #BusstopbySD

  ��️To read all articles by me use the below hashtag��️

  #TheSDarticles

  Read More

  बस स्टॉप

  || बस स्टॉप || - भाग 1

  'अरे यार आजपण ही डब्बा गाडी late झाली. माझं तर नशीबच पांडू आहे. दिवसभर मरमर मेल्यावर रात्री ह्या बससाठी ताटकळत उभं राहा!'
  माझं हे रोजचंच रडगाणं होतं. आजूबाजूला लहान मुलं बागडतात. तरुण प्रेमी युगुलं हातात हात घालून Romantic walk घेत असतात. Retired झालेली म्हतारी माणसं पाय मोकळे करायला आलेले असतात. एकंदर काय तर या संपूर्ण जगात सगळी माणसं सुखी आहेत आणि त्यात असंख्य दुःखांचं गाठोडं माझ्या मनावर मिरवत मी ह्या बसची वाट बघतोय.
  ह्या बसचे नखरे कमी की काय म्हणून त्या कंडक्टरचे "सुट्टे पैसे काढा" हे असले चोचले पण मीच पुरवायचे! कोणी आपल्या gf चे इतके नखरे पुरवत नसेल जितके मी त्या कंडक्टरचे पुरवतो!
  आयुष्यात सगळ्यात Negative जागा कोणती असेल तर हा बस स्टॉप!
  पण दिवसागणिक मी आयुष्याचं सूत्र समजून घेण्याचा प्रयत्न केला. 'निगेटिव्ह निगेटिव्ह इज इक्वल टु पाॅसिटिव्ह' हा नियम कदाचित माझ्या आयुष्यात जुळतोय का याची पडताळणी करू लागलो. आणि हळूहळू उत्तरं सापडायला लागली.
  ज्या बस स्टॉप वरच्या बस मधून मी एरवी प्रवास करायचो त्याच बस स्टॉप वर बसची वाट बघत असताना मी बस स्टॉप वर एका वेगळ्याच दुनियेचा प्रवास करू लागलोय. पूर्वी ज्या लहान मुलांकडे, प्रेमी युगुलांकडून आणि म्हाताऱ्यांकडे पाहून स्वतःच्या आयुष्याला कोसायचो. आज त्याच लोकांकडे पाहून आयुष्याची नवी व्याख्या शिकतो.

  To be continued... भाग 2

  ©TheSDspeaks