• lekhani2002 6w

  एकांत

  एका एकट्या मित्राने मला विचारलं की एकांत म्हणजे काय?
  स्वतःच्या पाऊलांचा रव ऐकू आला तर तो एकांत,
  स्वतःच्या देहाचा सुगंध आला तर तो एकांत,
  निसर्गाच्या सान्निध्यात जगण्याला उम्मीद देणारे भाव समजले तर तो एकांत,
  स्वतचा मनाशी संवाद साधला तर तो एकांत,
  जिवनात गुरफटलेली वाट सापडली तर तो एकांत,
  स्वतः चा श्वासांची लय अनुभवली तर तो एकांत,
  स्वतःलाच स्वताचा मनातल्या दर्पणात पाहिलस तर तो एकांत,
  मनात आसरा मिळाला तर तो एकांत,
  आयुष्यात काहीतरी हरवल्याची जाणीव झाली तर तो एकांत,
  स्वतःचा मनातलं पुस्तक वाचलं तर तो एकांत,
  जगाचा विचार सोडून स्वतःचा विचार आला तर तो एकांत,
  जेव्हा आठवणीत रमशील तर तो एकांत,
  वाहत्या आसवांचा गालाला झालेला स्पर्श जाणवला तर तो एकांत,
  मनात शेवटचा भेटीसाठी आसुसलास तर तो एकांत,

  शेवटी...
  शेवटची इच्छा आठवून देणारा तो एकांत,
  निसटलेल्या माणसांची आठवण करून देणारा तो एकांत,
  मरणाचा आधी अणि मरणाचा नंतर असतो तो फक्त एकांत........