• rashmi_mundle 9w

  कप-बशी

  कप आणि बशी म्हणजे
  सुंदर सोनेरी गोठ
  एकाचा धरावा लागतो कान
  दुसरीला अलगद लागतात ओठ..
  र्टे मधून जर कधी
  भेटीला आला एकटाच कप
  तर बशी बद्दलच्या प्रश्नांचा
  भडीमार होतो सपासप..
  कपाचा मोठा भाऊ मग
  पण बहिण नाही बशीला
  कपासमोर मोठ्ठा प्रश्न
  कुणासमोर लावु मगाचा वशिला..
  बशीला चढतो गर्व
  जेव्हा लागतात ओठ तिला
  कपाचा होतो तीळपापड
  चहा उकळतो केटलीतला..
  कपातला गरम चहा
  जेव्हा ओतल्या जातो बशीत
  थंड होतो त्याचा राग
  तो विसावतो बशीच्या कुशीत..
  कप आणि बशीची
  जोडी आहे झकास
  त्या दोघांच्या सोबतीने
  घडले देश आणि इतिहास..
  ©rashmi_mundle