• imsunny29 22w

  Ti

  सखे ऐक ना...
  काल पाऊस पडला ग इथे..
  आणि त्यात पुन्हा तुझी आठवण...
  वाटलं... सोबत असतीस, तर मनसोक्त भिजलो असतो...
  दोघेही... या पहिल्या पावसात..!
  .
  तू डोळे मिटून पावसाचे थेंब झेलीत असताना तुला अचानक पाठीमागून मिठीत घेतलं असतं... तो ओला बहर अनुभवताना...
  आणि थेंबा-थेंबाबरोबर येणारा तुझ्या मानेवरचा शहारा अनुभवला असता... अनुरक्त होऊन..
  मग मी ही डोळे मिटून तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून ऐकली असती पावसाची रिमझिम ती सुरेल टिपटिप...
  मग तू तुझे दोन्ही हात उंचावून आभाळाकडे बरसणारा एक एक मोती झेलला असता अलगद...
  आणि मी बघत राहिलो असतो सारखं... तुझ्या गोड गालांवर.. मानेवर.. ओठांवर बरसणाऱ्या पावसाच्या सरी... तुला कवेत घेऊन..!
  खरंच...
  सखे तू असतीस तर...
  .
  ©imsunny573