• sanjweli 47w

  साक्षात्कार

  मी ना आहे कोणत्या पक्षाचा
  ना प्रचारक कोणत्या नेत्याचा
  पण राहवलं नाही मित्रांनो
  हे बोलकं चित्र पाहुन
  वेध मराठी माणसाचा
  शोध मराठी माणसाचा

  एक जाणता राजा महाराष्ट्राचा
  तर दुजा राजा मराठी अस्मितेच्या गर्जनेचा
  वेळ काळ यावरती
  आहे उपाय जालीम औषधाचा
  उदय दिसतोय पहा होताना
  तरुणाईला अनुभवाचा
  साक्षात्कार झाल्याचा

  हातामधला हात पहा
  वाट अवखळ छोट्या
  पावलांचीही सुरु आहे
  उत्तर गुपिताचं एकच
  लवकरंच शरद-राज युग
  सुरु होणार आहे.

  ©महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
  ©sanjweli