• shabd_antariche 42w

  एक संध्याकाळ..

  आयुष्यातील एक संध्याकाळ तुझ्या सोबत घालवावी.. रात्र ही ताऱ्यांची सोबत तुझ्या पहावी...न बोलता कळावे तुला शब्द हे मनीचे..त्या शब्दांनीही रंगवावे आकाश स्वप्नीचे..

  आयुष्यातील एक संध्याकाळ सोबत तुझ्या घालवावी..
  ऊन सावलीचा खेळ पाहण्या तू तिथेच गुंतून जावी.. डोके तुझे खांद्यावर आणि हात हाती असावे.. मौन माझे आणि अवखळ शब्द तुझे असावे...

  आयुष्यातील एक संध्याकाळ सोबत तुझ्या घालवावी..शांत त्या किनाऱ्याच्या रेतीवर अनवाणी तु बागडावी..थंड ती वाऱ्याची झुळूक येता अचानकच मज येऊन बिलगावी..मोहक तुझ्या त्या स्पर्शासाठी धाव लाटांनी किनाऱ्याकडे घ्यावी...

  अशीच एक शांत संध्याकाळ सोबत तुझ्या घालवावी..भविष्यातील कल्पनांचे सुंदर चित्र मी रेखटावे..आणि हळुवार पणे तु प्रेमाचे रंग त्यात भरावे..अथांग सागराप्रमाणे नवे नाते आपले बहरावे..सगळी बंधने तोडून फक्त तु आणि मी मुक्तपणे वहावे ..

  ©shabd_antariche