• krishnakr 31w

  आई

  कुणी तीला बोलुन कधीच सांगत नाही कारण सर्वांच आईवर प्रेम असतचं आणि हे तीला ही माहीत असतं
  आणि खरंतर कधी तशी वेळचं येत नाही की आपलं किती प्रेम आहे तिच्यावर हे शब्दात सांगाव ,
  पण आज मला वाटलं की नाही संवेदना तर नेहमीच आहेत मग शब्द का नाहीत म्हणुन थोडं तिच्याबद्दल लिहावं वाटलं
  आज एक कारण तस त्याला कारणीभुत आहे म्हुणुन...


  जेव्हा मी पहिली वेळेस डोळे उघडले त्यावेळी एक चेहरा मला आवडला तो माझ्या आईचा होता , जेव्हा मी चालायला शिकु लागलो तेव्हा पडण्यापासुन वाचवणारा एक व्यक्ती होता तो माझा बाप होता.
  आयुष्य काय आहे , परिस्थिति कशी आहे याच्याशी माझा काहीच संबध नव्हता यासर्व गोष्टीशी मी अनोळखी होतो याच्याशी समरूपतेने ओळख करून देणारे ते माझे दैवत होते.
  कधी देवाला बघितले नाही , पण तो चेहरा नक्की त्या आई सारंखा असेल जीच्या अभिलाषेत फक्त एक निस्वार्थ व्यक्तिमत्व दडलेल आहे.
  सुखाच्या कित्येक गोष्टी मी बाहेर शोधत राहतो , दुखाच्या आकंताशिवाय माझ्यापदरी काहीच आलं नाही कारण परिस्थिती नेहमी आयुष्याशी हेळसांड करत राहते आणि त्याच्याशिवाय तीच भागतं ही नाही.
  पण एक अशी गोष्ट आहे जीच सामयित्व यापेक्षा ही खुप मोठ आहे
  कधी दिसत नाही भासतं नाही आणि जाणवतं पण नाही कारण ती नेहमी आपल्या सोबत असते आपल्या प्रत्येक दुखाशी तिचं नात हे आपल्या जन्माअगोदर पासुन जुडलेलं आहे ,
  ना ते कधी माघार घेतं ना त्याच्याशी तडजोड करतं
  परिपुर्णतेने आपल्या मर्यादेशी राहुन तिचं कर्तव्य संभाळुन आपल्या दुखांत ती सहभागी होऊन प्रत्येक परिस्थिति शी झुंझत राहते
  फक्त आपल्या मुलांसाठी ,
  ती कधी ओझं आहे म्हणुन किंवा चिंता आहे म्हणुन कधीच करत नाही ,
  तीचा आनंदच आपल्यापासुन सुरू होतो आणि आपल्यापासुनच संपतो
  याचा कुणी साक्ष नाही पण ही भावना तीच्यामध्ये नेहमी राहते ,
  अगदी अमर्यादित ज्याचा मी सुद्धा पाठपुरावा सुद्धा करू शकतं नाही
  फक्त एवढंच बोलु शकतो "आयुष्याची अशी शिदोरी आहे जी पुरत ही नाही आणि उरतं ही नाही"
  ©krishnakr