• baaji_pandav 30w

  थांब सये निरखु दे आज मज चंद्र पौर्णिमेचा
  वाट पाहीली बहुतकाल त्यास पाहण्याकरिता
  रोज रोज कोठे आता पाहण्यास ग दिसतो
  गर्दी भोवती मेघतार्यांची त्यात कोठे दडतो
  फार समय जाहला आता पाहुन प्रभा तयाची
  शितलमंद प्रकाशी डोके ठेवुन निजावयाची
  पुर्वी भारी गप्पा रमाव्या सोबती तयाच्या
  समय बदलला वेळ न राहीला आता पुर्वीसारिखा....

  अपुर्ण
  बाजी©