• sanjweli 22w

  पतंग

  दि. १२/६/२०१७

  पतंग

  मी दुर देशीचा पतंग आता
  येणार ना परतूनी

  निरोप माझा अखेरला
  भेटणार ना पुन्हा कधी

  विरह वसुंधरेचा छळे मला
  साद अखेरची घातली

  शुक्रतारा मी नभातला
  डोर तुटली कधीच माझी

  नको भावनांना आवेग आता
  साथ संपली कधीच माझी

  जा सामोरे जीवनाला
  स्वैर खग तू बनुनी

  तू राजा निळ्या अस्मानीचा
  आव्हानाची तुला कसली भीती

  हातामधी हात चिमुकला
  होता तुझा कधी

  नियतीचा हा खेळ संपला
  झेप माझी आभाळी

  घरामधली जागा आता
  उरली फक्त प्रतिमा माझी

  ##लाव्हा##

  ©महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
  ©sanjweli.blogsopt.com