• ganeshbhujbal 7w

  बोजड

  बोजड शब्दाच ओझं झालंय
  शब्द अन वलय पूर्ण झालंय

  अपेक्षित अनपेक्षित असच
  सार काही घडत चाललंय

  शब्दाचं ओझंच खूप झालंय
  मणामणाच ओझं पडलंय

  शब्दही कंठविहिन झालेत
  अव्यक्ततेच्या गर्तेत अडकलेत

  गर्दीत धावतो ऐसा एकलाच
  असून साऱ्यात असा निर्जन

  भावरूप अव्यक्त मनीचे विश्व
  अंतरी भावनाच ओझं बनलंय

  घुसमटून जातोय माझा जीव
  व्यक्त करणं अशक्य झालंय

  धावत धावत खूप दूर आलोय
  मित्र सगे सोयरे एकला पडलोय

  व्यक्त व्हावं तर सारेच हसतील
  दुखाच माझ्या भांडवल करतील

  खंत उरली आहे अजुनी मनात
  कमावला नाही मी सख्खा मित्र

  सहजच व्यक्त होईल जिथे सार
  तोही आधार बनून असेल सोबत

  खंत आणि शब्दाच ओझं घेऊन
  शोधतो आहे हक्काच व्यासपीठ

  शब्दाचं ओझं जिथे हलकं होईल
  मन स्वच्छंदी बनून उडत होईल
  ©ganeshbhujbal