• impaitenece 23w

  Father

  जो अंश आहे माझा तोच आज मला त्याचा
  सर्वात मोठा शत्रु समजतोय
  हथाचा पाळणा करुन मी
  स्वता:चा जोकर करून मी
  त्याला खेळवला
  तोच माझा सोन्या मला
  माझ्या रक्तापसुन मला वेगळा राह म्हणतोय
  काय मागितले आहे त्याला मी ?
  का कसला हट्ट केलाय मी?
  दोन गोड शब्दांची आस ठेवतोय त्याच्याकडुन
  ह्यात काय चुकिचा करतोय मी
  अरे रात्री रडुन रडुन माझ्या झोपेचा भूगा करयचा तो
  आज त्याला माझ्या घोरण्याचा त्रास होतोय
  म्हतारया झालेल्या माझ्या विचारांचा त्याला मनस्ताप होतोय
  तीन वेळेचे जेवन आणी राहयला जागा
  यामध्येच त्याला वाटतय कि त्याचे कर्त्तव्य संपलय
  अरे पण माझ्या मनाला सुध्दा त्याचा आधार पहीजे
  हे त्याला कुठे समजलय
  पण अशा या त्याच्या वगण्याने मी काही रडनार नाही
  माझ्या म्हातरपनाचा मी त्यला भास ही होऊ देनार नाही
  शेवटी बाप आहे मी त्याचा
  त्याच्यावर अवलंबून आहे मी
  असे त्याला मूळिच समजुन देनार नाही।
  ©impaitenece