• poetrysection 5w

  देहातले प्राण सुटले,
  मृत्युचा तांडव झाला।
  वेळोवेळी जगोजागी,
  कन्यांचा घात झाला।

  पितृसत्तेच्या लालसेपोटी,
  मातृत्त्वाचे हनन झाले।
  पंच पकवानाच्या थाळीत,
  उस्टे मात्र तिलाच दीले।

  वर्चस्वाचा दम देउनी,
  वाचा तिची अबोल केली।
  शब्द दाटूनी मात्र उरात,
  तिने मनमनातच कविता केली।

  हो जबाबदार आणि मला ही जगू दे।
  भविष्यात मला माझा इतिहास रचू दे।
  थांबवूनी हे भ्रुण हत्याचे पाप,
  दाखव जगाला तुच आहे उत्कृष्ट बाप।

  चला थांबवुया या रोगाला,
  असमानतेचा पाया घालुनी।
  समानतेचे शिखर गाठुया,
  स्त्रीशक्ति चे गड जिंकुनी।

  समान आहे मुलगा मुलगी,
  फरक मात्र एक नवा।
  पितृत्वेच्या अस्मितेला,
  मातृत्त्वाचा कणा हवा।

  Read More

  * स्त्री कणा *

  ©poetrysection