• _sach_in 46w

  जगणं

  आज सर्वत्र शुकशुकाट होता,
  निवडक जिवलगांचा रडलेल्याचा आवाज येत होता,
  कुठेतरी मनाला वाटून गेलं होतं,
  थोडं जगणं अजून राहून गेलं होतं।
  डोळ्यात दाटून भावना कित्येकजण जमले होते,
  तोबा गर्दीत कितीतरी ओळखी अनोळखी चेहरे होते,
  कुठेतरी मनाला वाटून गेलं होतं,
  थोडं जगणं अजून राहून गेलं होतं।
  स्वप्ने सगळी चक्काचूर झाली,
  जेव्हा त्यांच्यातील एक व्यक्ती बोलली
  नियती किती क्रूर झाली,
  मन उदासपणे फ़क्त पाहतचं होतं,
  कारण जगणं अजून थोडं राहून गेलं होतं।
  रामनाम जपाचे बोल त्यांचा मुखावाटे उमटत गेले,
  स्मशानाचा स्वारी पर्येंत खांदे त्यांचे बदलत गेले
  काहींना दिलेल्या वचनपुर्तीचे काम अर्धवट राहून गेलं
  जाता जाता कळलं की आपलं थोडं जगणं अजून राहून गेलं।
  लाकडांची जुळवाजुळव चालू झाली होती,
  थोड्याच वेळात माझ्या लाकडी पलंगाची रचना तयार झाली होती,
  माझ्यातल्या एका माणसाकडून मला अग्नी दिली गेली होती,
  कितीही वाटले तरी त्यांना शेवटचं स्पर्श करण्याची संधी हुकली होती,
  कुठेतरी मनाला हुरहूर लागून गेलं होतं,
  थोडं अजून जगणं राहून गेलं होतं।।
  ©_sach_in