• snehagandhar 23w

  काय देऊ शकते...??

  काय देऊ शकते..??
  सर,
  मी तुम्हाला काय देऊ शकते.?
  मी तुम्हाला शब्द शब्द देऊ शकते..

  कोणताही एक शब्द देणं कठीण असतं,
  कारण त्यात अख्खं आयुष्यच सामावलेलं असतं..

  एखादा शब्द देण्याईतपत माझी पोच नाही,
  आणि खरं सांगू का
  तो पेलवण्याची माझ्यात अजून कुवत नाही..

  तुम्ही म्हणाल, नको देऊस मग शब्द,
  पण खरच सांगते
  होऊ शकले नाही मी आज निःशब्द.!!!

  कसं सांगू, तुम्ही माझ्यासाठी काय केलायत.?
  एकच सांगते, माझ्यातला कलाकार तुम्ही जागा ठेवलायत..

  खरच सांगते, हे खूप कठीण असतं,
  पण तुम्हाला ते अगदी सहज शक्य होतं..

  'त' ला 'त' नि 'ट' ला 'ट' जोडणं सोप्पं असतं,
  पण गुरू-शिष्य नातं जपणं जरा कठीण असतं..

  शिष्य काय, अनेक गुरु करुन मोकळा होतो,
  तरीपण शिष्य कायमच रिता रहातो..

  शिष्याने गुरुला स्विकारणं खूपच सोप्प असतं.,
  पण गुरुकडून शिष्याला शिष्यत्व मिळणं कठीण असतं..

  नाही फरक पडत, लोक काय म्हणतील,
  फरक तेव्हाच पडेल, जेव्हा गुरू काय म्हणतील..

  म्हणून म्हंटलं, एक शब्द देणं जरा कठीण आहे,
  अनेक शब्द देऊन तुमचे ऋण फेडीत आहे..

  या एवढ्याश्या कवितेतून व्यक्त होणं सोप्पं असतं,
  परंतु माझ्यासारख्यांना नवं जीवन देणं कठीण असतं..

  मला माहीत्ये, की मी काही लेखिका नाही की कवियित्री नाही,
  पण तरी मी आज स्वताःला थांबवू शकले नाही..

  बस्स आता, इथेच थांबते अन् मन मोकळं करते,
  झालेल्या चूकांबद्दल क्षमा मागते..

  आणि हो, एवढे शब्द मात्र आपल्या ओंजळीत घ्या,
  अन् ओंजळ भरुन आपल्या या शिष्येला आशिर्वाद द्या..!!!!!!

  स्वप्नगंंधा करमरकर.
  ©snehagandhar