tejaskamble

tejask_poem (instagram id)

Grid View
List View
Reposts
 • tejaskamble 3w

  माय

  मोजता न यावे,माप घेऊन अंबर.
  कळे माय तेव्हा,हाती लागेल अंतर!

  तेजस@@k✍️✍️

 • tejaskamble 3w

  एकटी मी...

  असे वागणे तुझे कधी ना पाहिले मी.
  पाहिल्यावर तुला सख्या चाळले मी.

  अंधुक झाली असेल का माझी नजर?
  पण, स्पर्श होता तुझा थेट जाणले मी.

  बहरते तुझ्या सहवासात इथे तरीही!
  तरी का वाटते दोघात एकटी मी.

  तुझे हे असे चिडून जाणे आजून का रे?
  आसवात तुझ्या किती रे बुडायचे मी.

  थकून गेले होते तुझ्या प्रतिक्षेने.
  सोडले होते रे या जगात, जगायचे मी.


  तेजस@@k✍️✍️

 • tejaskamble 3w

  राग.

  काय करायचे ते करून जा.
  पण,मला एकदा तरी भेटून जा.

  राग आला तर ठीक आहे.
  पण, एकदा डोळ्यात माझ्या पाहून जा.

  हे मौन राहने तुझें किती वेळ असे?
  पण, किती वेळ ते सांगून जा.

  किती चालणार पाठमोरी अशी तू.
  पण, आसवांना रुमालाने पुसुन जा.

  हाक देता थांबलीस तू रस्त्यावरी.
  पण, मग माझ्याही आसवांना पुसून जा.

  शेवटी आले तिच्या चेहऱ्यावरी हसू.
  अन, तीच म्हणाली मला बिलगून जा!!!

  Tejas@@k✍️✍️

 • tejaskamble 3w

  Zikra

  Tuje itni khata hai
  To rehate q

  Tuje itni vafha hai
  To aisa krte q

  Kya mera pyar tuje
  such me nahi dikhta

  To log aksar muje
  khehate hai
  Mere chehare par tumhara
  Zikra q.

  Tejas@@k✍️✍️

 • tejaskamble 3w

  बोल सखे कधीतरी या वेड्या मुलाशी.
  जो रोज धरतो चेहरा तुझा काळजाशी.

  तेजसk@@✍️✍️

 • tejaskamble 3w

  तुझे हे असे चिडून जाणे आजून का रे?
  आसवात तुझ्या किती रे बुडायचे मी!

  थकून गेले होते तुझ्या प्रतिक्षेने.
  सोडले होते रे या जगात,जगायचे मी.

  तेजस@@k✍️✍️

 • tejaskamble 3w

  इश्क...

  कुछ नही था|तो कुछ किया मैने|
  'तेरी यादो को हर वक्त जिंदा किया मैने|

  तू छोड गया तो जिंदगी गुजर गयी सी थी मेरी|
  मैं हारी थी |पर तुझसे इश्क करना कभी ना छोडा मैने......

  Tejas@@k✍️

 • tejaskamble 4w

  तुला हे ज्ञात नाही का
  तुझ्या मी हृदयात नाही का?

  मेघ आला बरसून गेला
  तुझ्या मी आसवात नाही का?

  दरवळून गंन्ध चौफेर झाला
  कत्तल फुलांची तू केलीस का?

  रंगून मैफिलित चांदण्याच्या
  निखळता तारा तू पाहतेस का?

  कशी बिलगून जातेस सखे तू!
  समजावी डोळ्यातली ही आर्जवे का?

  पडावे लख्ख नभी चांदणे
  तू शुभ्र जरासे हशील का?

  तेजस@@k✍️✍️

 • tejaskamble 4w

  Kuchal do halatoko aur khde raho.
  Tufhan aayega tumhe takrayega tum usme date raho.

  Ye duniya badi jalim hai, tume kuch hasil karne nahi degi.
  Vo so gai to tum jagte rho.

  Kitna imhtihan legi zindagi humhari, vo dard se haregi tum dard se hosla banate raho.

  Ekdin chum legi aapko duniya
  Tumare haalaat dekhar. tum jeet ka taaj sarpar pehenkar chalte raho......

  Tejas@@k,✍️✍️

 • tejaskamble 4w

  तुम्हा जाण होती आई-बापविना पोरांची.
  हात डोहिवर ठेऊन माया केली हो पित्याची.

  कोणी नसते कोणाचे ही जगाचीच बात.
  आम्हा पदरा घेऊन मोडू काढली हो रीत

  नाही पहिला मी देव माझ्या या लोचनी.
  तुम्हा पुजले अंतरी ध्यास तुमचा ठेवुनी.

  हात जोडून वंदन करतो मी त्या मातेला
  जन्म दिला होता तिने पुत्र संस्काराने घडविला.

  जीव जीवाला देऊन फेडणारे ना हे पांग सारे
  तुमच्या आयुष्यातले हो आम्ही सदा राहू सहारे.

  मागू कुणाकडे मी तुमच्या मनातली इच्छा
  आमच्याकडून लाभो दीर्घ आयुष्य हिच आमची तुम्हाला सदिच्छा

  Wish u haapy bhirtday bhavji